Posts

MPSC

 *तिसरी आवृत्ती - सर्वत्र उपलब्ध* 😍🇮🇳 *राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३: GS 2* साठी अत्यंत उपयुक्त 🔥 भारतीय राज्यघटना, राजकारण, प्रशासन, पंचायतराज आणि कायद्यांचा समावेश असलेले पुस्तक   *पुस्तकाची sample copy ⚡️ *एकूण पाने : 694*  ⚡️ आता १५० गुणांची तयारी एकाच पुस्तकातून  ⚡️ लोकप्रशासन, सार्वजनिक धोरण तसेच आयोगाच्या 2020च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार अद्ययावत सर्व मुद्द्यांचा समावेश  🟤 CMP Order link: https://shop.chanakyamandal.org/product/bharitya-rajyaghatna-aani-kayde/   🟤 *Flipkart Link*: https://dl.flipkart.com/s/BYj0bmuuuN 
Image
 * कर्म* स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल. महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत होत्या. अनाथ मुले इकडे तिकडे फिरत होती. एखाद दुसरा पुरुष दिसत होता आणि सर्वांची महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात निजली होती.. तेव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले.. त्याला पाहून तिला रहावलं नाही. धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली.. ती म्हणते,सख्या असा तर मी विचारच नव्हता केला.असं कसं झालं? कृष्ण म्हणाले, पांचाली नियती खूप निष्ठुर असते. ती आपल्या मनाप्रमाणे चालते. द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना? तू यशस्वी झालीस. फक्त दुर्योधन आणि दुःशासन नाही, तर सर्वच कौरव संपले.. द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता..? द्रौपदी म्हणते, कृष्णा तू मला सावरायला आला आहेस की हिणवायला आला आहेस ? योगेश्वर म्हणतात 'नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं वास्तव सांगायला आलो आहे. आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. प...